शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करा - विनायक मेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:00 AM2017-12-11T00:00:01+5:302017-12-11T00:02:01+5:30
संकटांची साडेसाती मागे लागलेल्या शेतक-यांना आता ख-या अर्थाने दिलासा व धीर देण्याची गरज आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांना दिलासा व धीर देण्याचे काम करावे, अशा सूचना शिवसंग्रामाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी १० डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील शेतकरी सध्या बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहेत. नानाविध समस्यांमुळे त्यांचा धीर खचत चालला असल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. संकटांची साडेसाती मागे लागलेल्या शेतक-यांना आता ख-या अर्थाने दिलासा व धीर देण्याची गरज आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांना दिलासा व धीर देण्याचे काम करावे, अशा सूचना शिवसंग्रामाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी १० डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांना केल्या.
स्थानिक विश्रामगृहावर रविवारी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील लोढ, विभागीय अध्यक्ष शिवाभाऊ मोहड, जेष्ठ नेते श्यामभाऊ काबरा, अकोला जिल्हाध्यक्ष नानासाहेब भिसे, हिंगोली जिल्हाध्यक्ष परमेश्वर पोहकर, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव वाघ आदींची उपस्थिती होती. यावेळी मेटे यांनी विद्यमान स्थितीत शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर बोट ठेवत शेतकºयांना न्याय मिळण्याची खरी गरज असल्याचे सांगितले. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना मेटे यांनी केल्या. यावेळी शिवसंग्रामचे वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाघ, कामगार जिल्हाध्यक्ष राहुल भटकर, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, जिल्हा संघटक संजय कव्हर, संतोष सुर्वे, रामेश्वर अवचार, बाजीराव पाटील, पंकज सावध, सुनीता सरनाईक, रवी चोपडे, गजानन इढोळे, कृ. ऊ. बा. समिती संचालक घनश्याम मापारी, प्रदीप कुटे, नानाराव अवचार, नगरसेवक चंदू जाधव, रामदास बळी, अमोल सोनोने, महादेव जाधव, अमोल बाजड, महादेव उगले, सतीश गंगावणे, सागर भिसडे, सचिन काकडे, ऋषिकेश कुटे, दीपक बरडे, शंकर इढोळे, बालाजी गोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.