कृषी सहायकांचे ‘काम बंद’आंदोलन
By admin | Published: July 12, 2017 01:41 AM2017-07-12T01:41:51+5:302017-07-12T01:41:51+5:30
मंगरुळपीर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात मंगरूळपीर तालुक्यातील कृषी सहायक सहभागी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात मंगरूळपीर तालुक्यातील कृषी सहायक सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने १२ जून ते १४ जून या कालावधीत काळ्या फिती लावून कामकाज केले. १५ ते १७ जूनदरम्यान लेखणी बंद आंदोलन, १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन, २१ ते २३ जून दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण, २७ जून रोजी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर धरणे आंदोलन, तर ५ जुलै रोजी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला; मात्र त्याउपरही शासनाने मागण्यांसंदर्भात ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व कृषी सहायकांनी १० जुलैपासून बेमुदत कामे बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामात विविध पिकांसंबंधी तांत्रिक मार्गदर्शन करणे, मग्रारोहयो अंतर्गतची फळबाग लागवड, दुबार पेरणी अहवाल तसेच पीक विमा योजना यांसारख्या योजनांच्या कामांवरही परिणाम जाणवत आहे.