साठवण तलावाचे काम थातूरमातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:52+5:302021-06-25T04:28:52+5:30
तालुक्यात ई-क्लास जमिनीवर पाणी अडवून पाणी जिरविण्यासाठी लाखो-कोटी रुपयांचे साठवण तलाव, शेततलाव, सिमेंट प्लगची निर्मिती मागील अनेक वर्षांपासून अनेक ...
तालुक्यात ई-क्लास जमिनीवर पाणी अडवून पाणी जिरविण्यासाठी लाखो-कोटी रुपयांचे साठवण तलाव, शेततलाव, सिमेंट प्लगची निर्मिती मागील अनेक वर्षांपासून अनेक गावांत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली आहे. यातील बहुतांश कामे थातूरमातूर झालीत. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच हे बंधारे, प्लग वाहून गेले, ही वास्तविकता तालुक्यात आहे.
या तलावाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने साठवण तलावाचे महिन्यापूर्वी थातूरमातूर काम करून शासकीय निधीची विल्हेवाट लावल्याचे या तलावाच्या पाहणीवरून तत्काळ लक्षात येते.
साठवण तलावाच्या मध्यभागी कृषी विभागाच्या अखत्यारीत प्रचंड मोठे व तालुक्यात कुठेही नसेल असा आणखी एक तलाव खोदलेला असतानाच या शेततलावाच्या समोरच काही मीटर अंतरावर जुन्या साठवण तलावाच्या दुरुस्तीचे काम केले. हे काम करताना मोठ्या शिताफीने थोडीबहुत माती खोदून तलावाच्या भिंतीवर टाकत दुरुस्तीच्या निधीचा अपव्यय केल्याचे लक्षात येते.