शिकस्त इमारतीतुन चालतो सुकांडा ग्रामपंचायतचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:55 PM2019-06-09T12:55:09+5:302019-06-09T12:55:57+5:30
राजुरा (वाशिम) : येथून जवळच असलेल्या सुकांडा येथे गावगाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायतला सुस्थितील इमारतच नाही. परिणामी एका छोटेखानी शिकस्त इमारतीतुनच सरपंच व सचिवांना गावचा कारभार बघावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा (वाशिम) : येथून जवळच असलेल्या सुकांडा येथे गावगाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायतला सुस्थितील इमारतच नाही. परिणामी एका छोटेखानी शिकस्त इमारतीतुनच सरपंच व सचिवांना गावचा कारभार बघावा लागत आहे.
मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सुकांडा गावची जवळपास तीन हजारावर लोकसंख्या आहे. ग्रामपंचायतचा कारभार बघण्यासाठी सुसज्ज अशा ग्रामपंचायत भवनाची गरज असताना एका दहा बाय दहा आकाराच्या टिनपत्राच्या खोलीतुन सरपंच व सचिवांना कामकाज करावे लागत आहे.
दरमहा आयोजित मासीक सभेसाठी सदस्यांना अपुºया जागेतच खुर्च्या टाकून बसावे लागते. ग्रामसभा अथवा इतर सभा घ्यावयाची झाल्यास जिल्हा परिषद शाळेच्या आवारात उघडयावर घ्यावी लागत असल्याचे वास्तव आहे. ग्राम पंचायतची शिकस्त इमारत ६० वर्षापेक्षाही अधिक कालावधीची जुनी आहे. पावसाळयाचे दिवसात भितीचा मलबा आपोआप खचतो. सदरहू इमारत जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असून शाळेतील विद्यार्थी मधल्या सुटीत अथवा फावल्या वेळेत या इमारती लगतच खेळत असल्याने एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देवून सुकांड येथे ग्राम पंचायत भवन देण्याची मागणी होत आहे.
सुकांडा येथील ग्राम पंचापयत कार्यालयाची छोटेखानी इमारत शिकस्त झाली आहे. या ठिकाणी कामकाज करणे गैरसोयीचे ठरत आहे. सुसज्ज ग्राम पंचायत भवन मिळावे, अशी मागणी आहे.
- कैलासराव घुगे
सरपंच, सुकांडा