जुन्या बस्थानकावरील प्रसाधनगृहाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:44 AM2021-09-03T04:44:15+5:302021-09-03T04:44:15+5:30
मालेगाव : शहरातील जुन्या बसस्थानकावर महिला प्रसाधनगृहाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून रखडूनसुद्धा अत्यंत कासवगतीने सुरू असून, कंत्राटदारांच्या ...
मालेगाव : शहरातील जुन्या बसस्थानकावर महिला प्रसाधनगृहाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून रखडूनसुद्धा अत्यंत कासवगतीने सुरू असून, कंत्राटदारांच्या मनमर्जीप्रमाणे सुरू आहे. याबाबत नगरपंचायतसुद्धा दखल घेत नसून, नागरिकांना तसेच प्रवाशांना उघड्यावर विधी उरकावा लागत आहे.
सदर काम सुरू होऊन जवळपास दोन वर्षे होत असूनसुद्धा सदर बांधकाम पूर्ण होत नसल्याने याबाबत नगरपंचायतच्या बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला ३ मार्च २०१९ व १९ सप्टेंबर २०२० ला एक नोटीस दिली होती. त्या दोन्ही नोटिसीलासुद्धा संबंधित कंत्राटदाराने राजकीय पाठबळाच्या जोरावर नगरपंचायतला कोणतेही उत्तर न देता केराची टोपली दाखविली . तरीसुद्धा नगरपंचायत बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराविरुद्ध अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने नगरपंचायतच्या बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सदर बांधकाम कोणत्याही अभियंत्यांमार्फत वा प्रगत कारागिरामार्फत न करता मजुरांकडून अत्यंत थातूरमातूर व निकृष्ट दर्जाचे हाेत आहे. कामातही अनियमितता आहे. सदर कामाची निष्पक्ष चौकशी व्हावी व सदर काम पाडून नव्याने सुरू करावे व सदर कामाचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून नुकसानभरपाई म्हणून घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे
020921\img_20210902_143314.jpg
रखडले