‘सुजलाम्-सुफलाम’ योजनेंतर्गत शेतततळ्यांच्या कामास सुरूवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:35 PM2018-12-12T12:35:01+5:302018-12-12T12:35:23+5:30

मालेगाव (वाशिम) : भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हाभरातील गावांमध्ये जलसंधारणाची विविध स्वरूपातील कामे होण्याकरिता ‘सुजलाम्-सुफलाम’ अभियान हाती घेण्यात आले आहे.

work under the 'Sujlam-Suhlam' scheme | ‘सुजलाम्-सुफलाम’ योजनेंतर्गत शेतततळ्यांच्या कामास सुरूवात!

‘सुजलाम्-सुफलाम’ योजनेंतर्गत शेतततळ्यांच्या कामास सुरूवात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हाभरातील गावांमध्ये जलसंधारणाची विविध स्वरूपातील कामे होण्याकरिता ‘सुजलाम्-सुफलाम’ अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम होत असून याअंतर्गत मोठ्या आकारमानाच्या शेतततळ्यांच्या कामांनाही बुधवारपासून सुरूवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमाविषयी गावोगावच्या शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे.
‘सुजलाम्-सुफलाम’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रशासकीय यंत्रणेतील बहुतांश कर्मचारी गुंतले आहेत. विशेषत: कृषी विभागाने या कामांमध्ये स्वत:ला झोकून दिले असून मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे बुधवारपासून सुरू झालेल्या शेततळ्यांच्या कामांमध्येही कृषी विभागातील कर्मचाºयांचा सहभाग प्रामुख्याने दिसून आला.

Web Title: work under the 'Sujlam-Suhlam' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.