वनवृत्तात होणार जलसंधारणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 03:48 PM2019-03-01T15:48:15+5:302019-03-01T15:48:39+5:30
वाशिम : राज्यातील वनवृत्तातही जलसंधारण व्हावे आणि मानव -वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने शासनाने चार वन वृत्तांत खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्याचे ठरविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील वनवृत्तातही जलसंधारण व्हावे आणि मानव -वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने शासनाने चार वन वृत्तांत खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्याचे ठरविले आहे. यासाठी ३ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी ३१ जानेवारीच्या निर्णयाव्दारे मंजूर केला असून, यात यवतमाळ वनवृत्तात येणाºया भागांसाठी १ कोटी १ लाख रुपयांची तरतूद आहे.
राज्यातील गडचिरोली, यवतमाळ, औरंगाबाद व अमरावती या वनवृत्तात साठवण तलाव, खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची प्रस्तावित कामे करण्याबाबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी शासनाकडे पत्र पाठविले होते. आता २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात वनतळे, सिमेंट बंधाºयाचे बांधकाम करण्याच्या योजनेसाठी ११ कोटींचा निधी मंजूर आणि अर्थ संकल्पित असून, या निधीपैकी ३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी वनतळे, सिमेंट बंधाºयांची कामे करण्यासाठी वितरित करण्यात आला असून, अपर प्रधान मुख्य नवसंरक्षकांच्या मागणीनुसार उपरोक्त चार वनवृत्तात ३७९.२६ लाख रुपयांचा वितरित व खर्च करण्यास शासनाने ३१ जानेवारीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. या निधीतून मंजूर असलेली जलसंधारणाची कामेच करण्यात येणार असून, त्यात यवतमाळ वनवृत्तात वनतळे, खोदतळे, सिमेंट बंधाºयांच्या कामांसाठी १ कोटी १ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे यवतमाळ वनवृत्तातंर्गत येणाºया यवतमाळ प्रादेशिक वन परिक्षेत्रासह अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील प्रादेशिक वनक्षेत्रातही वनतळे, सिमेंट बंधाºयांची कामे होऊन वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय होईल आणि पाण्यासाठी भटकणाºया वन्यप्राण्यांचा जीवही वाचू शकणार आहे.
वाशिम जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी प्रादेशिक वनपरिक्षेत्रात साठवण तळे व जलसंधारणाची कामे गतवर्षी प्रस्तावित करण्यात आली होती. आता शासनाने निधी मंजूर केल्यानंतर ही कामे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- अशोक वायाळ, सहाय्यक वनसंरक्षक, प्रादेशिक, वाशिम