सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:13+5:302021-09-02T05:29:13+5:30

वाशिम : राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय ...

Work will be allotted to well-educated unemployed organizations | सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप

Next

वाशिम : राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप करण्यात येणार असून, ६ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्रांकडे विविध कंत्राटी प्रकारची पदे भरण्यासाठी मागणी प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्रांकडे नोंदणीकृत जिल्ह्यातील इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायट्यांनी ६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र, वाशिम येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. बेरोजगारांनी स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी ही सहकार कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, तसेच ही संस्था कार्यरत असल्याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहायक उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. संस्थेतील सदस्य क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. संस्थेच्या सदस्यांचे सेवायोजना कार्ड चालू स्थितीत असणे आवश्यक आहे, असे बजाज यांनी स्पष्ट केले.

०००००००००

लेखापरीक्षण अहवाल आवश्यक

प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थेने तिचा आर्थिक वर्ष २०२०-२१चा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक आहे. सुशिक्षित बेरोजगार संस्थेची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे.

Web Title: Work will be allotted to well-educated unemployed organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.