कामचुकारांवर कारवाई अटळ! - ऊर्जामंत्री बावनकुळे

By admin | Published: May 19, 2017 01:01 AM2017-05-19T01:01:03+5:302017-05-19T01:01:03+5:30

उपअभियंता, दोन शाखा अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिस

Workers are unavoidable! - Energy minister Bawankulay | कामचुकारांवर कारवाई अटळ! - ऊर्जामंत्री बावनकुळे

कामचुकारांवर कारवाई अटळ! - ऊर्जामंत्री बावनकुळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जे अधिकारी कामचुकारपणा करतील, त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत उर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महावितरणमधील अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य जाणून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणे अपेक्षित आहे. जे अधिकारी यात कमी पडतील, त्यांच्या थेट ‘सीआर’वर त्याचा परिणाम होणार आहे. यात शासन कुठलीच हयगय करणार नाही. जिल्ह्यात आगामी वर्षभरात ९० कोटी रुपये खर्चून पारेषणला मजबूत करायचे असून १५० कोटी रुपये खर्चून दीड वर्षांत महावितरणला मजबूती देण्याचे शासनाने धोरण आखले आहे. २०२५ पर्यंत जिल्हा विजेच्या बाबतीत परिपूर्ण होईल, या दिशेने ठोस पावले उचलली जातील. वीज चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, माजी आमदार विजयराव जाधव, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर असलेल्या ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी गुरूवारी सकाळी ११ पासून दुपारी २.३० पर्यंत महावितरणच्या मुख्य कार्यालयात जनता दरबार घेतला. त्यात शेतकऱ्यांसह महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकांच्या तक्रारी, अडचणी जाणून घेत त्याचे निवारण केले.महावितरणचे उपअभियंता अतूल देवकर यांच्यासह शाखा अभियंता पवन टिकार, मेताम आणि लिपीक सतीश बिर्ले यांना कामात दिरंगाई केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावण्यात आली. संयुक्तिक कारण न दर्शविल्यास संबंधितांची इतर जिल्ह्यात तडकाफडकी बदली करण्यात यावी, असे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांना दिले.

Web Title: Workers are unavoidable! - Energy minister Bawankulay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.