मालेगाव तालुक्यातील डाकपालांची कामे सोपविली रोजंदारी कर्मचा-यांकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:08 PM2017-11-03T19:08:43+5:302017-11-03T19:09:49+5:30

मालेगाव(वाशिम): तालुक्यातील शाखा डाकपालांची १५ पदे रिक्त आहेत. त्यापैकी काहीठिकाणी रोजंदारी तत्वावरील कर्मचाºयांकडे पदभार सोपविण्यात आला आहे; तर काहीठिकाणी अद्याप कुणीच कार्यरत नाही. रिक्त पदांमुळे कामे प्रभावित होत आहेत. 

Workers of the office of Malegaon taluka have handed over the wages to the wage earner! | मालेगाव तालुक्यातील डाकपालांची कामे सोपविली रोजंदारी कर्मचा-यांकडे!

मालेगाव तालुक्यातील डाकपालांची कामे सोपविली रोजंदारी कर्मचा-यांकडे!

Next
ठळक मुद्देमालेगाव येथील प्रकारशाखा डाकपालांची १५ पदे रिक्त रिक्त पदांमुळे कामे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव(वाशिम): तालुक्यातील शाखा डाकपालांची १५ पदे रिक्त आहेत. त्यापैकी काहीठिकाणी रोजंदारी तत्वावरील कर्मचाºयांकडे पदभार सोपविण्यात आला आहे; तर काहीठिकाणी अद्याप कुणीच कार्यरत नाही. रिक्त पदांमुळे कामे प्रभावित होत आहेत. 
मालेगाव तालुक्यात दोन उपडाकघर मालेगाव व शिरपूर येथे कार्यान्वित आहेत. त्यापैकी मालेगाव उपडाकघराच्या अखत्यारीत १९ शाखा डाकघर आहेत; तर शिरपूर उपडाकघराच्या अखत्यारीत १५ शाखा डाकघर येतात. यापैकी मारसुळ, नंधाना, कळंबेश्वर, मुंगळा, डव्हा, मेडशी, केनवड, मांगुळ झनक, चिचांबापेन, करंजी आदी शाखा डाकघरात डाकपालांची पदे रिक्त आहेत. काहीठिकाणी रोजंदारीवर कर्मचारी कार्य करीत आहेत. काहीठिकाणी तर रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत कर्मचाºयांच्या नातेवाईकांनाच प्राधान्य देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे. 

Web Title: Workers of the office of Malegaon taluka have handed over the wages to the wage earner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.