महामार्गावरील प्रवासी निवाऱ्यांचा कामगारांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:45+5:302021-06-28T04:27:45+5:30

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांलगत विविध गावांच्या रस्त्यांवर प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत शेतीसह महावितरणची वीजवाहिनी जोडणारे, पेरणी ...

Workers' shelters on highways support workers | महामार्गावरील प्रवासी निवाऱ्यांचा कामगारांना आधार

महामार्गावरील प्रवासी निवाऱ्यांचा कामगारांना आधार

googlenewsNext

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांलगत विविध गावांच्या रस्त्यांवर प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत शेतीसह महावितरणची वीजवाहिनी जोडणारे, पेरणी यंत्र, ट्रॅक्टर चालविणारे कामगार यांना हे प्रवासी निवारे आधार देत आहेत. पाणी, पाऊस सुरू असताना कामगार मंडळी या निवाऱ्यांत विश्रांतीसह जेवण करताना दिसत आहेत.

जिल्ह्यात सुरू असलेल्या चार राष्ट्रीय महामार्गांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गावर दिशादर्शक, गावांतील चौकाचौकात पथदिवे लावण्यात येत आहेत. मार्गावरील वळणावर वाहनधारकांना कळावे म्हणून परावर्तकही लावण्यात आले. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मार्गावर लोखंडी प्रवासी निवारे उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत एसटीच्या सर्वच फेऱ्या सुरू नसल्याने आणि ग्रामीण भागात थांबे नसल्याने हे प्रवासी निवारे रिकामेच असतात. अशात या मार्गावर विविध कामे करणाऱ्या विविध ठिकाणच्या कामगारांना त्याचा मोठा आधार होत आहे. नाल्या खोदणारे, खांब रोवणारे, तसेच शेतीत विविध कामे करणारे कामगार या प्रवासी निवाऱ्यात पावसाच्या वेळी आधार घेत आहेत, तसेच जेवण करण्यासह विसावाही घेताना दिसत आहेत.

--------

रात्रीही कामगारांचा मुक्काम

सद्य:स्थितीत पूर्णत्वास आलेल्या महामार्गावर फलक लावणे, मैलांचे दगड रंगविणे, तसेच नाल्या खोदण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे करणाऱ्या कामगारांना रात्री उशीर झाल्यानंतर ते मार्गावरील निवाऱ्यातच झोपून मुक्काम करीत असल्याचेही चित्रही काही ठिकाणी दिसून येते.

Web Title: Workers' shelters on highways support workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.