उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड घेतले जाणार परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:33 AM2017-11-27T02:33:05+5:302017-11-27T02:34:12+5:30

अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

The workers will not be able to return to the plot! | उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड घेतले जाणार परत!

उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड घेतले जाणार परत!

Next
ठळक मुद्देवाशिम एमआयडीसी४५0 एकर जमीन विनावापर पडून

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हय़ातील चार तालुक्यांमध्ये असलेल्या ‘एमआयडीसी’पैकी वाशिम शहरानजीकच्या एमआयडीसीत टप्प्याटप्प्याने सर्वच प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. असे असले तरी ५३७ एकर क्षेत्रापैकी आजमितीस केवळ २५ एकर क्षेत्रावरच सात उद्योग उभे झाले. तथापि, गत अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिममध्ये हिंगोली रोडवर ५३७ एकर क्षेत्रात ‘एमआयडीसी’ वसलेली आहे. गेल्या काही वर्षांत ‘एमआयडीसी’ परिसरात कोट्यवधी रुपयांचा निधी खचरून चकाचक रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. आवश्यक त्या सर्वठिकाणी विद्यूत पथदिवेदेखील लावण्यात आले. उद्योगधंद्यांच्या पाण्याची अडचण भागविण्याकरिता नजीकच्या बोराळा धरणावरून पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र प्राथमिक स्तरावर उद्योगधंद्यांना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्यामुळे अपेक्षित प्रयत्न झाल्यास मोठय़ा कंपन्या वाशिमच्या एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करू शकतात; मात्र त्यासाठी प्रशासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक प्रयत्नांची नितांत आवश्यकता भासत आहे.
वाशिममध्ये वाटप करण्यात आलेल्या ९७ भूखंडांपैकी आजमितीस सुमारे ९0 भूखंडांवर ज्यांनी मालकी हक्क ठेवला आहे, त्यांनी विनाविलंब बांधकाम करून प्रस्तावित उद्योग सुरू करणे आवश्यक आहे. ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत बांधकाम करून उद्योग सुरू न झाल्यास भूखंड परत करण्याचा नियम आहे. त्यानुसार, लवकरच भूखंड परत घेण्याची ठोस कार्यवाही प्रशासनाकडून केली जाणार आहे.

वाशिमच्या ‘एमआयडीसी’त उद्योगांसाठी पोषक स्थिती!
अमृतसर, इंदूर, खंडवा, अकोला, नांदेड, हैद्राबाद यासह अनेक बड्या शहरांना जोडणारा रेल्वेमार्ग वाशिममधून गेला असून, आंध्रप्रदेशची सीमादेखील जिल्हय़ापासून काहीच अंतरावरच आहे. मोठय़ा उद्योगधंद्यांसाठी ही बाब निश्‍चितपणे पोषक ठरणारी आहे.

८३0 कोटींचा प्रकल्प वळता झाला नागपुरात!
सन २0१५ मध्ये ‘कोका कोला’ या कंपनीच्या काही प्रतिनिधींनी ‘एमआयडीसी’मध्ये जागेची पाहणी केली होती; मात्र त्यांना प्रशासनाकडून तद्वतच राजकीय क्षेत्रातून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ८३0 कोटी रुपयांचा हा प्रकल्प वाशिमऐवजी नागपुरात वळता झाला.

वाशिमच्या ‘एमआयडीसी’मध्ये उद्योगास लागणार्‍या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना भूखंड मिळाला, त्यांनी विनाविलंब बांधकाम करून उद्योग सुरू करणे क्रमप्राप्त आहे. असे न झाल्यास दिलेला भूखंड परत घेण्याची कार्यवाही केली जाईल.
- सी.एस. डोईजड
क्षेत्र व्यवस्थापक, एमआयडीसी
-
 

Web Title: The workers will not be able to return to the plot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.