‘सहस्त्र सिंचन’च्या १२00 विहिरींची कामे सुरू
By admin | Published: April 30, 2017 02:30 AM2017-04-30T02:30:28+5:302017-04-30T02:30:28+5:30
उद्दिष्ट गाठण्यासाठी धावपळ ; ३0 जूनपर्यंंत पूर्ण कराव्या लागणार सहा हजार विहिरी.
वाशिम : जिल्ह्यातील शेतकर्यांना सिंचनासाठी हक्काचे पाणी मिळावे, या उद्देशाने पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजना राबविली जात आहे. या अंतर्गत ३0 जूनपयर्ंत सहा हजार विहिरींची कामे पूर्ण करावयाची असून, १ हजार २0५ विहिरींची कामे सुरू झाली आहेत. येत्या दोन महिन्यांच्या कालावधित उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता कृषी विभागाची धावपळ सुरू आहे.
पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत २४ डिसेंबर २0१६ पयर्ंत अर्ज स्वीकारून १0 जानेवारी २0१७ पयर्ंत सर्वेक्षण करण्यासह १५ जानेवारीपयर्ंत या विहिरींना ग्रामसभेत मान्यता मिळवून घेणे अपेक्षित होते; परंतु या प्रक्रियेतच मोठा कालावधी निघून गेला. त्यामुळे लाभार्थींंची निवड करण्यास विलंब लागला. या योजनेंतर्गत शेतकर्यांकडून प्राप्त १८ हजार ४४५ अर्जांंपैकी ६ हजार ८६५ अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेच्या लाभार्थींंची निवड करण्यासाठी सहा तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्यानंतरही मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाशिम तालुक्यात १0 विहिरींची, तर मानोरा तालुक्यात पात्र ठरलेल्या केवळ २ विहिरींची कामे सुरू झाली होती. गंभीर बाब म्हणजे प्रशासनाच्या प्रयत्नांनंतरही ग्रामसभांचे आयोजनच करण्यात आले नव्हते. त्यामुळे निर्धारित उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय वाटत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे यांनी वारंवार बैठका घेऊन आपल्या सहकार्यांंना कामाची गती वाढविण्यास सांगितले. त्यामुळे शनिवार, २९ एप्रिलपर्यंंत जिल्ह्यात १ हजार २0५ विहिरींची कामे सुरू होऊ शकली असून, येत्या दोन महिन्यांच्या कालावधित उर्वरित विहिरी सुरू होऊन सहस्त्र सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होण्याचा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.