वाशिम जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 04:28 PM2019-03-11T16:28:27+5:302019-03-11T16:28:34+5:30
वाशिम : ग्रामीण भागातील मजूरांना हक्काचा रोजगार देण्यासाठी अस्तित्वात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागातील मजूरांना हक्काचा रोजगार देण्यासाठी अस्तित्वात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे जिल्ह्यातील मजूरांना रोजगार मिळणे अशक्य झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड, फळबाग लागवड, मातीनाला बांध, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध, कम्पार्टमेंट बांध, जैविक बंधारा, खार जमिन विकास बंधारा, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, सलग समतल चर, फळबाग लागवड, तुतीची लागवड, सिंचन विहिरी, सिंचन विहिरींची दुरुस्ती व गाळ काढणे, कालव्यांमधील गाळ हटविणे, सफाई, अस्तरीकरण व नुतनीकरण, पाटचºया दुरुस्ती, मातीचे कालवे, नदी/नाला पुनरुज्जीवन, पांदन रस्ते, अंतर्गत रस्ते यासह इतर स्वरूपातील कामे केली जातात. मात्र, सदर कामे बहुतांश ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे ‘जॉबकार्ड’धारक मजूरांवर उपासमारीची वेळ ओढवत असून रोजगाराच्या शोधात अनेक मजूरांनी परजिल्ह्यात स्थलांतरण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे निरंतर सुरूच असून ‘जॉबकार्ड’धारक मजूरांना रोजगारही उपलब्ध करून दिला जात आहे. कामांची संख्या मात्र कमी असल्याने निश्चितपणे रोजगार निर्मितीही कमी प्रमाणात होत आहे. आगामी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेची कामे सुरू झाल्यानंतर हा प्रश्न निकाली निघणार आहे.
- शैलेष हिंगे
उपजिल्हाधिकारी (रोहयो), वाशिम