सोयाबीन पीक उत्पादकतावाढीसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:27+5:302021-06-06T04:30:27+5:30

या अष्टसूत्रीमधील आठ सूत्र म्हणजे बियाणांची उगवणक्षमता तपासणी करणे, घरगुती बियाणांचा वापर करताना बियाणांची प्रतवारी करून उगवणक्षमता तपासणे, बियाणांची ...

Workshop on Soybean Crop Productivity Enhancement | सोयाबीन पीक उत्पादकतावाढीसाठी कार्यशाळा

सोयाबीन पीक उत्पादकतावाढीसाठी कार्यशाळा

Next

या अष्टसूत्रीमधील आठ सूत्र म्हणजे बियाणांची उगवणक्षमता तपासणी करणे, घरगुती बियाणांचा वापर करताना बियाणांची प्रतवारी करून उगवणक्षमता तपासणे, बियाणांची जैविक व रासायनिक बीजप्रक्रिया, योग्य वाणाची निवड, पेरणीची पद्धत, किमान ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्यावर योग्य खोलीवर पेरणी करणे, बियाणांची मात्रा, रासायनिक खतांची मात्रा, तणनाशकाचा योग्य प्रकारे वापर तसेच पेरणी करताना बीबीएफ यंत्र वापरून पेरणी करणे या सर्व बाबींचा अवलंब करण्याचे आवाहन मंडल कृषी अधिकारी उमेश राठोड, कृषी पर्यवेक्षक राजेश राठोड व कृषी सहायक सुनीता वानखेडे यांनी केले आहे. सोबतच शासनाच्या दहा टक्के खत बचत मोहिमेविषयी जमीन सुपीकता निर्देशांक वापर करून दहा टक्के खत बचतविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कृषी सहायक वानखेडे यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक तसेच बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी उपसरपंच जनार्दन पाठे. रामदास पाठे, गजानन पाठे, जयराम पाठे, शांताबाई कुंभार, गोपाल पाठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Workshop on Soybean Crop Productivity Enhancement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.