कार्यशाळेतून दिला महिला सक्षमीकरणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 05:36 PM2019-03-08T17:36:42+5:302019-03-08T17:37:01+5:30
वाशिम : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी स्थानिक नियोजन भवनात आयोजित महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी स्थानिक नियोजन भवनात आयोजित महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने आयोजित या मेळाव्याला जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त माया केदार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, डॉ. अलका मकासरे, सोनाली ठाकूर, शुभदा नायक, अॅड. दिपाली सांबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज, विधी अधिकारी राधा नरवलिया, आरोग्य विस्तार अधिकारी कल्पना सावळे यांची उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, सोनाली ठाकूर, अलका मकासरे, योगिता भारद्वाज यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. दुसºया सत्रात अॅड. दिपाली सांबर, कल्पना सावळे, राधा नरवलिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. स्री पुरुष समानता, महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता, महिला आणि कायदेविषयक बाबीं या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मोरे यांनी केले.