जागतिक वसुंधरा दिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:44 AM2021-04-23T04:44:05+5:302021-04-23T04:44:05+5:30
कोरोना महामारीमुळे अनेक रुग्ण ऑक्सिजनअभावी मृत्यू पावत आहेत, कृत्रिम ऑक्सिजन कमी पडत आहेत. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक ऑक्सिजन कमी पडू ...
कोरोना महामारीमुळे अनेक रुग्ण ऑक्सिजनअभावी मृत्यू पावत आहेत, कृत्रिम ऑक्सिजन कमी पडत आहेत. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
असे आवाहन मानोरा येथील सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी एम.एम. बाळापुरे यांनी केले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण, जलसंवर्धन, आवश्यक आहे. वसुंधराचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. शालेय विद्यार्थी यांना पर्यावरण शिक्षण देण्यात येत असून, राष्ट्रीय हरित सेनेमार्फत त्यांना माहिती मिळत आहे. विविध जातीच्या वृक्षांची बी गोळा करून पावसाळ्यात त्यांच्या कलमा करून शाळा परिसर, शेतीच्या धुऱ्यावर, पडीक जमिनीवर लागवड केली पाहिजे, सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीमधून उपलब्ध रोप घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून हरित वसुंधरा करू, असा संकल्प सर्वांनी केला पाहिजे. असेही ते म्हणाले.