मंगरुळपीर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 06:25 PM2018-08-12T18:25:11+5:302018-08-12T18:26:08+5:30
मंगरुळपीर: आदिवासी बांधवांच्यावतीने शहरात १२ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: आदिवासी बांधवांच्यावतीने शहरात १२ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती होती. या मिरवणुकीत सहभागी समाजबांधवांना शिवसेनेच्यावतीने खिचडीचे वाटप करण्यात आले.
या मिरवणुकीला शहरालगतच्या शहापूर येथील गाडगे महाराज मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला. ही मिरवणूक शहरातील अकोला रोड मार्गे शिवाजी चौक, बिरबलनाथ चौक,भगतसिंग चौक,आंबेडकर चौक,महात्मा फुले चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात येऊन गाडगे महाराज मंदिराजवळ समारोप करण्यात आला.मिरवणुकीत आदिवासी संस्कृतीचे देखावे,पारंपरिक वेशभूषा,नृत्य,वादन, ढोल, डफडे हे आकर्षण ठरले. तसेच बिरसा मुंडा यांची प्रतिमा असलेल्या वाहनावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.