मंगरुळपीर तालुक्यात वरली- मटका बोकाळला

By admin | Published: December 20, 2014 01:01 AM2014-12-20T01:01:11+5:302014-12-20T01:01:11+5:30

मंगरूळपीर पोलिसांचे दुर्लक्ष.

Worli-Mangta Bokalala in Mangarilpir taluka | मंगरुळपीर तालुक्यात वरली- मटका बोकाळला

मंगरुळपीर तालुक्यात वरली- मटका बोकाळला

Next

मंगरूळपीर : मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोलीस चौक्या व बीटमध्ये अवैध धंदे मोठय़ा प्रमाणात फोफावले असून, याकडे संबंधितांचे साफ दुर्लक्ष असल्याचे लोकमतने १९ डिसेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून आढळून आले. शेलुबाजारसह मंगरूळपीर तालुक्यात चोरट्या मार्गाने गल्ली-गल्लीत वरलीचा अवैध धंदा सर्रास सुरू असल्याचे आढळून आले. मंगरूळपीर तालुक्यामध्ये मंगरूळपीर व आसेगाव पोलीस स्टेशनसह शेलुबाजार येथे १ पोलीस चौकी तर ५ बीट आहेत. बीटमध्ये मानोली, कवठळ, शिवणी रोड, मोहरी व मंगरूळपीर टाऊनचा समावेश आहे. तालुक्यातील लोकमतच्या प्रतिनिधींनी आज १९ डिसेंबर रोजी चोरट्या मार्गाने पोलिसांना अंधारात ठेवून अवैध मार्गाने सुरू असलेल्या वरलीच्या धंदय़ाची माहिती घेतली असता आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केवळ आसेगाव या गावात कुठेही वरलीचा धंदा सुरू असल्याचे आढळून आले नाही; परंतु या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धानोरा फाट्यावर मात्र काही जण वरलीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. शेलुबाजार येथे मोठय़ा प्रमाणात वरलीचा धंदा चालतो. शेलुबाजार येथील मुख्य चौकातील कॉम्प्लेक्स मागे व आठवडी बाजार रस्त्यावरील एका गल्लीमध्ये चिठ्ठय़ा लिहिणारे बसलेले नेहमीच आढळून येतात. एखादवेळी पोलीस विभागाचा एखादा कर्मचारी इकडे येताना दिसला की, सर्वजण सैरावैरा धावताना दिसून येत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते; मात्र गत काही दिवसांपासून अवैध वरली-मटक्याचा व्यवसाय चोरट्या मार्गाने बिनधास्त सुरू आहे. शेलुबाजार तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने या गावाला ४0 खेडी जोडल्याने सर्वात जास्त व्यवसाय येथे आढळून येतो.

Web Title: Worli-Mangta Bokalala in Mangarilpir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.