कारंजा उपजिल्हा रुग्णालयात संदिग्ध रुग्णाच्या भोजनात आढळला कीडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:54 PM2020-06-17T12:54:25+5:302020-06-17T12:54:41+5:30
संदिग्ध रुग्णाच्या भोजनात चक्क शिजलेला किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार १५ जून रोजी रात्री उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर कारंजा तालुका स्तरावर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित व संदिग्ध रुग्णांसाठी ५० खाटांची व्यवस्था करण्यसात आली. या उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या संदिग्ध रुग्णाच्या भोजनात चक्क शिजलेला किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार १५ जून रोजी रात्री उघडकीस आला.
कारंजा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व लक्षणे असलेल्या संदिग्ध रुग्णांसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्यानुसार कारंजा शहरातील व ग्रामीण भागातील कोरोना संदिग्ध रुग्णांना डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात येते. त्या रुग्णाला सकाळ व संध्याकाळी आरोग्य विभागाकडून नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून भोजन देण्यात येते असल्याची माहिती आहे. त्यानुसार कारंजा येथील एका संदिेग्ध रुग्णाला १५ जून रोजी रात्रीच्या दरम्यान दिलेल्या जेवणात शिजविलेला किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांला रुग्णाने विचारले असता जेवण कोणाकडून व कोण देते या बाबत माहिती डॉक्टरांनी दिली नाही. रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळल्या जात आहे.
यासंदर्भात चौकशी सुरू आहे, की किडा खरंच निघाला की कोणी टाकला हे चौकशीतून निष्पन्न झाल्यावर कार्यवाही करू.
- राहुल जाधव,
उपविभागीय अधिकारी
बचत गटामार्फत व्यवस्थित अन्न शिजवल्या जात असून ते व्यवस्थित अन्न रुग्णापर्यत पोचविल्या जात आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी.
- विजय वाहाणे, व्यवस्थापक
आर्थिक विकास महामंडळ