शिरपूर येथे रविवारी कुस्त्यांची महादंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 02:36 PM2019-03-08T14:36:05+5:302019-03-08T14:37:03+5:30
शिरपूर जैन (वाशिम): दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील कुस्ती मंडळाने महाशिवरात्रीनिमित्त १० मार्च रोजी कुस्त्यांची महादंगल आयोजित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील कुस्ती मंडळाने महाशिवरात्रीनिमित्त १० मार्च रोजी कुस्त्यांची महादंगल आयोजित केली आहे. या दंगलीतील विजेत्याला चांदीची गदा आणि १ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. शिरपूर येथे आयोजित कुस्त्यांच्या महादंगलीचे उद्घाटन महेशगिर बाबा यांच्या हस्ते होणार आहे.
शिरपूर येथील कुस्ती मंडळाच्यावतीने दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची महा दंगल भरविण्यात येते. यंदा १० मार्च रोजी ही कुस्त्यांची महादंगल आयोजित केली आहे. या कुस्त्यांच्या महादंगलीसाठी उमेश इंगोले /रमेश इंगोले या भावंडाकडून प्रथम बक्षीस १ लाख रुपये ठेवण्यात आले आहे, तसेच गणेश घोडमोडे व विनोद गौर यांच्याकडून प्रत्येकी १ किलो चांदीची गदा ठेवण्यात आली आहे. आयुष ठेकेदार, विलास गवळी यांच्याकडून दुसरे बक्षीस ७१ हजार, प्रशांतनाना देशमुख, अरुण कालवे यांच्याकडून तिसरे बक्षीस ५१ हजार, रमजान रेघीवाले, दस्तगीर पैलवान यांच्याकडून चौथे बक्षीस ४१ हजार, बाळू जटाळे, लखन मानवतकर यांच्याकडून पाचवे बक्षीस ३१ हजार, सतिष शेंडे यांच्याकडून सहावे बक्षीस २१ हजार, गणेश भालेराव, नंदकिशोर गोरे यांच्याकडून सातवे बक्षीस १५ हजार, सुदर्शन गाभणे यांच्याकडून आठवे बक्षीस ११हजार, प्रदीप देशमुख यांच्याकडून नववे ९ हजार, संतोष आकले यांच्याकडून दहावे बक्षीस ७ हजार, तर रामेश्वर जोगदंड यांच्याकडून अकरावे बक्षीस ५ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.