आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर चढाईकरिता यश इंगोले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:03+5:302021-08-13T04:47:03+5:30

आफ्रिका खंडातील किलीमांजारो शिखर चढाई करणाऱ्या चमूत येथील १९ वर्षीय यश मारोती इंगोले या युवा गिर्यारोहकाची निवड करण्यात ...

Yash Ingole leaves for the highest peak in Africa | आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर चढाईकरिता यश इंगोले रवाना

आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर चढाईकरिता यश इंगोले रवाना

googlenewsNext

आफ्रिका खंडातील किलीमांजारो शिखर चढाई करणाऱ्या चमूत येथील १९ वर्षीय यश मारोती इंगोले या युवा गिर्यारोहकाची निवड करण्यात आली असून १९३४० फूट उंचीचे सर्वोच्च शिखर

चढाई करण्याकरिता यश इंगोले याने टांझानियासाठी प्रस्थान केले आहे.

वाशिम अर्बन बँकेत सेवारत असलेले मारोती इंगोले यांचा मुलगा यश इंगोले याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिसोड येथील अग्रगण्य व्यापारी तथा अजंता फार्मा लिमिटेड औरंगाबादचे अध्यक्ष मन्नालाल अग्रवाल यांनी रोख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. आगामी १५ ऑगस्ट रोजी आफ्रिका खंडातील किलीमांजारो या सर्वोच्च शिखरावर भारतीय ध्वज फडकविण्याचे स्वप्न यश याने बाळगले आहे. यश याने हिमाचल प्रदेशातील मनाली येथील अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अँड अलाइड स्पोर्ट या संस्थेतून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षणेदरम्यान त्याने १५ हजार फूट यशस्वी चढाई केली असून महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील ५४०० फूट असलेले कळसूबाई या सर्वोच्च शिखरावर दोन वेळा यशस्वी चढाई केली आहे. तर सह्याद्री पर्वत रांगामधील १८ किल्ले व ३ समुद्री किल्ल्यावर सुद्धा त्याने चढाई केली आहे. वाशिम जिल्ह्याकरिता अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या यशने जिल्ह्याचा गौरव वाढविला असल्याचे मनोगत अजंता फार्मा लिमिटेडचे अध्यक्ष मन्नालाल अग्रवाल यांनी व्यक्त केले. यश हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पताका रोवून देशाचे नावलौकिक करेल, असा विश्वास जिल्हावासी बाळगून आहेत.

Web Title: Yash Ingole leaves for the highest peak in Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.