यशोमती ठाकूर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:24+5:302021-05-24T04:39:24+5:30
कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल सेवानिवृत्त योजना कर्मचा-यांनी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ...
कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल सेवानिवृत्त योजना कर्मचा-यांनी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन शनिवारी सत्कार केला.
नामदार यशोमती ठाकूर यांचे शनिवारी वाशिमनगरीत आगमन झाले होते. लाखाळस परिसरातील रहिवासी व माजी जि.प. अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांच्या निवासस्थानी योजना सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या वतीने अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरणराव सरनाईक व शिखरचंद बागरेचा यांनी ठाकूर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे ना. ठाकूर यांनी कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे कुटुंब व बालकल्याण योजनेच्या सेवानिवृत्त योजना कर्मचाऱ्यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.