आसोला येथील यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:28+5:302021-04-18T04:40:28+5:30
दरवर्षी आसोला येथे संत सोहमनाथ महाराज संस्थानाकडून बारसनिमित्त्त भव्य यात्रा भरत असते. यासह पालखी सोहळाही हर्षोल्लोसात काढला जातो. या ...
दरवर्षी आसोला येथे संत सोहमनाथ महाराज संस्थानाकडून बारसनिमित्त्त भव्य यात्रा भरत असते. यासह पालखी सोहळाही हर्षोल्लोसात काढला जातो. या दोन वषार्पासून मात्र कोरोणा विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दरवर्षी गुडीपाडव्यापासून संगीतमय रामायण कथा, भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्रींची पालखी सोहळा प्रदक्षिणा काढण्यात येते. तसेच महाप्रसादाचे भव्य प्रमाणात आयोजन केले जाते. हजारो भाविक दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात. संस्थान परिसरात १० दिवस भक्तिमय वातावरण व यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी मात्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोहमनाथ महाराजांच्या यात्रेला वाशिम जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील इतरही जिल्हातील भाविक भक्तांची मोठी गर्दी असते. सोहमनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त २४ एप्रिलपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याची सोहमनाथ महाराज संस्थानचे पुजारी पुरुषोत्तम गिरी महाराज यांनी दिली.