दीड वर्षांपासून कलापथक जनजागृतीच्या कार्यक्रमांना कात्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:10 AM2017-11-27T01:10:48+5:302017-11-27T01:12:38+5:30
कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात होती. मात्र, गत एक ते दीड वर्षांपासून कलापथक जनजागृती कार्यक्रमांच्या खर्चाला शासनाने कात्री दिल्यामुळे जिल्हयातील अनेक कलावंत या कार्यक्रमापासुन वंचित राहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात होती. मात्र, गत एक ते दीड वर्षांपासून कलापथक जनजागृती कार्यक्रमांच्या खर्चाला शासनाने कात्री दिल्यामुळे जिल्हयातील अनेक कलावंत या कार्यक्रमापासुन वंचित राहिले. शासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयाअंतर्गत राबविण्यात येणाºया योजनांसंदर्भात कलापथक जनजागृती कार्यक्रम मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हयातील विविध कलावतांनी एकवटले आहेत. यासंदर्भात कलावंतांनी जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला निवेदनही दिले.
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांतर्गत सामाजिक न्यााय विभागाच्या योजना व विशेष घटक योजना याविषयी वाशिम जिल्ह्यात सन २०१० ते २०१५ पर्यत कलापथकाचे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले होते. परंतु दीड वषार्पासून हे कार्यक्रम जिल्हयात राबविले जात नसल्यामुळे कलावंतांची उपासमार होत आहे. इतर जिल्हयात हे कार्यक्रम राबविल्या जात आहेत. इतर जिल्हयात कार्यक्रम देण्यास बाहेरील जिल्हयातील कलावंतांना नाकारण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागात चौकशीदरम्यान निधी नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. याअगोदर हा निधी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यामार्फत वितरीत करण्यात येत होता. परंतु या कार्यालयाने दोन वर्षापासून कलापथक जनजागृती कार्यक्रमासाठी मागणीच केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सेवाभावी काम करणाºया कलावंतांवर अन्याय होत आहे. आम्ही कलावंत असल्यामुळे आम्हाला कोणी रोजमजुरीकरीताही बोलावत नाही. त्यामुळे आमच्या मुलामुलींच्या शिक्षण व आरोग्याची अडचण भासत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने जिल्हा नियोजन अधिकारी व सामाजिक न्याय विभागाकडे कलापथकासाठी निधीची मागणी करावी. जेणेकरुन कलावंतांना उपासमारीची पाळी येणार नाही. कलावंतांच्या या मागणीचा त्वरीत विचार करुन न्याय देण्यात यावा अशी मागणी कलावंतांनी केली. निवेदनावर शाहीर दत्तराव मोरे, संतोष खडसे, प्रज्ञानंद भगत, वनिता भगत, रवि जोगदंड, रतन हाडे, विश्वनाथ इंगोले, लोडजी भगत, लोकचंद श्रृंगारे, सोपान बनसोड, भिमराव लबडे, सिध्दार्थ भगत, यशवंता खंडारे, विद्या भगत, आनंद रणबावळे, दत्ता वानखेडे या कलावंतांच्या स्वाक्षरी आहेत.