गावागावात पत्ते खेळण्याची वर्षानुवर्षांंची परंपरा !

By admin | Published: March 12, 2017 01:52 AM2017-03-12T01:52:36+5:302017-03-12T01:52:36+5:30

धुलीवंदनानिमित्त रंगपंचमीला पत्ते खेळण्याची ग्रामीण भागातील परंपरा आजही कायम.

Year-old tradition of playing cards in village village! | गावागावात पत्ते खेळण्याची वर्षानुवर्षांंची परंपरा !

गावागावात पत्ते खेळण्याची वर्षानुवर्षांंची परंपरा !

Next

वाशिम, दि. ११- होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे रंगपंचमीला पत्ते खेळण्याची ग्रामीण भागातील परंपरा आजही कायम असून यामध्ये लाखो रुपयाची उलाढाल होते. विशेष म्हणजे या दिवशी पत्ते खेळण्यात तरुणांपासून ते वृद्धांपर्यंंत सर्वच अग्रेसर असतात !
वाशिम जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. वर्षानुवर्षे ग्रामीण भागात चावडया, मारोतीच्या पारावर, शेतात रंगपंचमीच्या दिवशी सकाळपासूनच पत्त्यांचे डाव रंगतात. यामध्ये तरुणांपासून ते वयोवृद्ध सहभागी होतात. तरुणाईमध्ये रमी, ताश पत्ते, तर वृद्धांमध्ये चौसर हा खेळ प्रामुख्याने खेळला जातो. यामध्ये पैसेही लावले जातात. वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेली १५ गावे, मंगरूळपीर तालुक्यातील ७ गावे या खेळासाठी प्रसिद्ध आहेत. या गावात शेजारील गावातूनही अनेक जण पत्ते खेळण्यासाठी येतात.
दरवर्षी पोलीस विभागाच्यावतीने या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जातो, मात्र, प्रथा, परंरपरेच्या नावाखाली फार मोठी कारवाई केली जात नसल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Year-old tradition of playing cards in village village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.