यंदा संत झोलेबाबा यात्रोत्सव होणार साध्या पध्दतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:45+5:302021-01-13T05:44:45+5:30
यावर्षी कोरोना संसंर्गामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असून, शासनाने याविषयी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसारच झोलेबाबांचा यात्रोत्सव साध्या पध्दतीने ...
यावर्षी कोरोना संसंर्गामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असून, शासनाने याविषयी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसारच झोलेबाबांचा यात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा केला जाईल. याबाबत संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे. यंदा संत झोलेबाबा यात्रोत्सवाचे ५६ वे वर्ष असून, २८ जानेवारी रोजी बाबांचा यात्रोत्सव प्रथमच साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. यात २१ जानेवारीला बाबांच्या बंगईच्या ठिकाणी हभप विठ्ठलदास महाराज यांच्या वाणीतून भागवत वाचन केले जाणार आहे. २७ जानेवारी रोजी भागवताची समाप्ती करण्यात येईल. २८ जानेवारीला यात्रोत्सवाच्या दिवशी सकाळी ४ वाजता बाबांची महापूजा, अभिषेक, सकाळी ६ वाजता आरती व नंतरचे नेहमीचे कार्यक्रम साध्या पध्दतीने पार पाडण्यात येणार आहे. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला असून, भाविकांना बंद पाकिटातून प्रसाद वाटप करण्यात येईल अशी माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे.