यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच साजरा होणार योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:28+5:302021-06-20T04:27:28+5:30
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येणार आहे. सन २०२० मध्ये ज्याप्रमाणे कोराना ...
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येणार आहे. सन २०२० मध्ये ज्याप्रमाणे कोराना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्याचप्रमाणे यंदाही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. २१ जून रोजी सकाळी ७ वाजता गुगल मिट लिंकद्वारे ऑनलाइन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सर्व अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, विद्यार्थी यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. ऑनलाइन सहभाग नोंदविणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
योगा दिनासंबंधी चर्चा करण्यासाठी १७ जून रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली. यावेळी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, जिल्हा पतंजली योग समितीचे कोषाध्यक्ष डॉ. भगवान वानखेडे, सत्यानंद योग केंद्राचे संचालक रामनारायण छापरवाल, शिक्षण विभागाचे बबन देशमुख, एस.बी. सरनाईक, आयुष विभागातील योग चिकित्सक तेजस्विनी माणिकराव, आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय चव्हाण, स्काऊटचे जिल्हा संघटक राजेश गावडे, गाइडच्या जिल्हा संघटक प्रीती गोलर आदींची उपस्थिती होती.