योगामुळे वैश्विक बंधुता निर्माण होण्यास मदत
By admin | Published: June 22, 2016 12:37 AM2016-06-22T00:37:29+5:302016-06-22T00:44:02+5:30
वाशिम येथील योग दिनाचा मुख्य कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे हस्ते उद्घाटन.
वाशिम : योग हा केवळ व्यायाम प्रकार नसून, ते एक तत्त्वज्ञान आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्त जगभरात आयोजित कार्यक्रमांमुळे वैश्विक बंधुता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. स्थानिक वाटणे लॉन्स येथे जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री परिवार व नेहरू युवा केंद्र यांच्या विद्यमाने आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष लता उलेमाले, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार बळवंत अरखराव, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. हरीश बाहेती, दिनकर वाटणे, सुरेश लोथ आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांनी एकात्मितेची भावना जोपासण्याची शपथ घेतली. योग प्रशिक्षिका दीपा वानखेडे यांनी उपस्थिताना योगविषयक मार्गदर्शन केले.