पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:36+5:302021-01-10T04:31:36+5:30

जिल्ह्यात २०१६, २०१७-१८ मध्ये पाेलीस भरती घेण्यात आली हाेती. त्यांनतर जिल्ह्यात पाेलीस भरतीच घेण्यात आली नाही. यामध्ये जिल्ह्यातील अनेक ...

Young upset over cancellation of police recruitment GR | पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज

पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज

Next

जिल्ह्यात २०१६, २०१७-१८ मध्ये पाेलीस भरती घेण्यात आली हाेती. त्यांनतर जिल्ह्यात पाेलीस भरतीच घेण्यात आली नाही. यामध्ये जिल्ह्यातील अनेक तरुण सहभागी झाले हाेते. तेव्हा काही कारणास्तव रद्द ठरलेले तरुण रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यात भरतीचा जीआर निघाल्याने त्यांच्यामध्ये आनंद दिसून येत हाेता; परंतु ४ जानेवारीला ताे जीआर रद्द करण्यात आल्याने पोलीस भरतीच्या तयारीला लागलेल्या तरुणांच्या पदरी अवघ्या काही दिवसातच निराशा आलीय.

.............

जिल्ह्यात ६८० लोकांमागे एक पोलीस

जिल्ह्यात पोलिसांची संख्या केवळ १,५०० आहे. जिल्ह्याची २०११ नुसार लाेकसंख्या १० लाख २६ हजार पाहता ६८० लाेकांमागे एक पाेलीस कर्मचारी दिसून येताे. यामुळे पाेलिसांवर किती माेठा ताण आहे हे दिसून येते. नागरिकांचे संरक्षणासह जिल्ह्यातील अनेक प्रकाराला आळा घलताना पाेलिसांची दमछाक हाेत आहे.

................

तरुणांच्या प्रतिक्रिया

२०१७-१८ पासून पाेलीस भरती झाली नाही. काही दिवसांपूर्वी पाेलीस भरतीबाबत जीआर काढण्यात आला हाेता; परंतु ताेही रद्द करण्यात आल्याने पाेलीस हाेण्याची आशा धूसर झाली आहे. तब्बल तीन वर्षांपासून पाेलीस भरतीसाठी मेहनत घेत आहे. गत भरतीमध्ये केवळ तीन मार्कांनी भरती हाेऊ शकलाे नाही. यावर विचार हाेणे गरजेचे आहे.

- रवी माेहळे, जांभरुण परांडे

..............

शेतीवर आमचे कुटुंब असून मी गत तीन वर्षांपासून पाेलीस भरतीसाठी मेहनत घेत आहे. त्यात वय वाढत आहे. लवकच भरती प्रक्रिया न झाल्यास पाेलीस हाेण्याचे स्वप्न स्वप्नच राहील. गत भरतीमध्ये ग्राउंडमध्ये कमी पडलाे हाेताे. यावेळी मेहनत घेतली; परंतु पाेलीस भरती हाेईल की नाही, ही चिंता आहे.

- संताेष कैलास गायकवाड

जांभरुण परांडे

...........

पाेलीस भरतीसाठी काढण्यात आलेला जीआर रद्द झाल्याने पाेलीस हाेण्याच्या आशा मावळल्या. अनेक वर्षांपासून मेघाभरती नाही. ५ ते ६ हजार भरती हाेते. त्यातही नव्यानेच रद्द केलेल्या जीआरमुळे उमेदवार नाराज झाले आहेत. माझे कुटुंब शेतीवर अवलंबून असून घरच्यांची पाेलीस व्हायची इच्छा आहे; परंतु वय वाढत असल्याने पाेलीस भरती लवकर झाली तरच खरे.

- ओंकार वानखडे, वाळकी मांजरी

Web Title: Young upset over cancellation of police recruitment GR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.