वाशिम जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवकांचा कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:55 PM2019-12-25T13:55:08+5:302019-12-25T13:55:15+5:30
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक, युवतींनी विविध कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये २४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक, युवतींनी विविध कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
युवा महोत्सवाचे उदघाटन प्राचार्य विरेंद्र वाटाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.प्रा.डॉ.शुभांगी दामले,निलेश सोमाणी, प्रमोद कोपनकर, संदीप पट्टेबहादुर, विनोद पट्टेबहादुर, क्रीडा अधिकारी मिलींद काटोलकर, प्रा.डॉ.अनिल सोनुने, हरीषचंद्र पोफळे, अमोल खडसे, प्रविण जोशी, रतन राठोड, सुनिल भिमजिवनाणी आदींची उपस्थिती होती. सदर स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, तबला, लोकगीत, लोकनृत्य, एकांकिका, कथ्थक, हार्मोनियम लाईट, शास्त्रीय संगीत आदी कला प्रकारात युवकांनी सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुषार राऊत याने प्रथम तर ओम भालेराव याने द्वितीय क्रमाक, लोकनृत्यमध्ये प्रथम इंदिरा गांधी कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मानोरा तर द्वितीय सावित्रीबाई महिला महाविद्यालय, लोकगीतमध्ये प्रथम विद्याभुषन फाउंडेशन तर द्वितीय सावित्रीबाई फुले महीला महाविद्यालय, एकांकिका मध्ये मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाचा चमु विजयी झाला तसेच शास्त्रीय गायनमध्ये प्रिती पाठक प्रथम व श्वेता कुन्हे द्वितीय तर तबला वादनमध्ये राम बारटक्के प्रथम तर कथ्थक मध्ये पौर्णिमा देव प्रथम तर हार्मोनियम लाईटमध्ये प्रतिक्षा इंगोले प्रथम इत्यादी कलाकार विजयी होऊन अमरावती येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पधेसार्ठी पात्र ठरले आहेत. यावेळी लोकगित, लोकनृृत्य कलेने उपस्थितांचे लक्ष वेधले.
युवा महोत्सवाचे बक्षीस वितरण किशोर बोंडे (युवा महोत्सव संयोजक), अर्चना वाघ, गजानन वाघ, सुनिल देशमुख, संतोष कनकावार, अनिल देशमुख, विष्णु इढोळे,विनोद जवळकर व सर्व परिक्षक इत्यादीच्या हस्ते पार पडले. युवा महोत्सवाचे संचालन शाम वानखडे तर आभार प्रदर्शन किशोर बोंडे यांनी केले. युवा महोत्सव यशस्वी करण्याकरिता कलीम बेग मिर्झ, भारत वैद्य, सुरज भड, महेश वानखेडे, मारोती ठोके, अविनाश गोटे मानदार, रवि ठोके, विजय लोणारे, भागवत मापारी,राहुल ठोके, केशव शिंदे, अर्शद सय्यद, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केद्र, नॅशनल युथ क्लॅब, नवरंग क्रीडा मंडळ, सुदर्शन क्रीडा मंडळांच्या युवकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)