वृक्ष संगोपनासाठी सरसावले युवक;  डोक्यावर हंडा भरुन वृक्षांना पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 02:27 PM2019-06-01T14:27:16+5:302019-06-01T14:28:19+5:30

मंगरुळपीर :  कोणतीही प्रसिध्दी व गाजावाजा न करता मंगरुळपीर तालुकयातील काही युवक वृक्ष संगोपनासाठी सरसावले आहे

The youth came to save tree; giving water manualy | वृक्ष संगोपनासाठी सरसावले युवक;  डोक्यावर हंडा भरुन वृक्षांना पाणी 

वृक्ष संगोपनासाठी सरसावले युवक;  डोक्यावर हंडा भरुन वृक्षांना पाणी 

Next

- नाना देवळे  
मंगरुळपीर :  कोणतीही प्रसिध्दी व गाजावाजा न करता मंगरुळपीर तालुकयातील काही युवक वृक्ष संगोपनासाठी सरसावले आहेत. विशेष म्हणजे गावात पाणी टंचाई असताना सुध्दा ते गावातून हंडयाव्दारे डोक्यावर पाणी आणून वृक्ष जगविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक परिसरातील गावकरी करतांना दिसून येत आहेत.
चिंचाळा ते मानोली रस्तयावर मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. सदर वृक्षांना पाणी नसल्याने ते जगू शकणार नसल्याचे पाहून या दोन्ही गावातील युवकांनी एक उपक्रम राबविण्याचे ठरविले. या उपक्रमाचा प्रमुख कोण, पुढाकार कर्ता कोण याची विचारणा केली असता कोणाचेही नाव घेणे योग्य नसून आम्ही सर्व एकजुटीने कार्य करीत असल्याचे युवक सांगत आहेत. सदर उपक्रम हा प्रसिध्दीसाठी किंवा कोणत्याही उद्देशाने सुरु केलेला नाही. शासनाच्यावतिने एवढया मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे  त्यात आमचेही योगदान लाभावे हाच या मागचा उद्देश असल्याचे युवकांकडून सांगण्यात येत आहे. 
मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा ते मानोली रोड वर डांबरीकरण रस्त्याच्या दुर्तफा वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. वातावरणामध्ये उष्णता दिवसेंदिवस वाढल्याने वृक्ष कोमजत आहे त्यामुळे त्यांना हिरवे ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याने भरून डोक्यावर हंडा धरवून झाडे जगवण्यासाठी जात असतांना येणाºया जाणाº्या चे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक गावातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांतूनही करण्यात येत आहे. या उपक्रमात दिवसेंदिवस गावातील युवकांचा सहभाग वाढतांना दिसून येत आहे.

Web Title: The youth came to save tree; giving water manualy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.