रिसोड - वाशिम मार्गावर अपघातात रिठद येथील युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:35 PM2018-12-26T17:35:38+5:302018-12-26T17:35:55+5:30
रिसोड (वाशिम) : भरघाव अज्ञात वाहनाने चारचाकी वाहनास धडक दिल्याने तालुक्यातील रिठद येथील एका तरुण डॉक्टरचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना२५ डिसेंबर रोजी रात्री १:३० वाजता रिसोड ते वाशिम मार्गावर वनोजा फाट्यावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : भरघाव अज्ञात वाहनाने चारचाकी वाहनास धडक दिल्याने तालुक्यातील रिठद येथील एका तरुण डॉक्टरचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी रात्री १:३० वाजता रिसोड ते वाशिम मार्गावर वनोजा फाट्यावर घडली. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी अज्ञात वाहनचालक विरोधात गुन्हा दाखल केला. डॉ. प्रविण किसन बोरकर (३०) असे मृतकाचे नाव आहे.
रिसोड तालुक्यातील रिठद येथील डॉ. प्रविण किसन बोरकर हे कुंकवाचा कार्यक्रम आटोपून आपल्या काही मित्रांना रिसोड येथे सोडून एम. एच.३० ए टी ३४६ क्रमांकाच्या कारने २५ डिसेंबरला रात्री उशिरा आपल्या गावी रिठदकडे जात होते. रात्री १:३० वाजतादरम्यान वनोजा फाटा येथे एका अज्ञात वाहनाने कारला जबर धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तसेच कारचा अक्षरश: चुराडा झाला.या दुर्घटनेचा आवाज रस्त्यालगत असलेल्या वस्तीत गेल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठले. पोलीस पाटलाने या घटनेची माहिती रिसोड पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल खुळे यांनी आपले सहकारी मनोज ब्राह्मण व वाहनचालक आनंद काकडे यांच्यासोबत घटनास्थळ गाठुन पाहणी केली. या घटनेत डॉ. प्रवीण बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला. २६ डिसेंबर रोजी शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरण अंतिम संस्कार करण्यात आले.
राजु बोरकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्याम कुलवंत करित आहेत.
प्रतिष्ठाने बंद
या दुर्घटनेची माहिती बुधवारी सकाळी वाºयासारखी पसरताच जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने रिठद गाठले. गावातील व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.