सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात युवक मेळावा व चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:22 PM2017-10-11T13:22:18+5:302017-10-11T13:22:27+5:30
वाशीम : सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय जि.प. वाशीम अंतर्गत स्थानिक श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात व्यसनमुक्ती सप्ताहाअंतर्गत युवक मेळावा व चर्चासत्र घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जमधाडे तर व्यसनमुक्ती मार्गदर्शक पंकज चव्हाण, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त संतोष खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी शाहीर संतोष खडसे यांनी आपल्या शाहीरी कलेतून व्यसनापासून निर्माण होणारे धोके समजावून सांगत युवा पिढीने व्यसनापासून दुर राहण्याचे आवाहन केले. मनुष्यजन्म हा एकच वेळ मिळत असून युवा पिढीने व्यसनाला विरोध करुन आपली शरीर संपत्ती ही सुद्ढ ठेवावी असे आवाहन संतोष खडसे यांनी केले. पंकज चव्हाण म्हणाले की, युवक हा देशाचा आधारस्तंभ असून युवकांनी या व्यसनाला बळी न पडता त्याचा आपल्या मनशक्तीने विरोध करावा. मनाला संयमीत ठेवून आपल्यासोबतच इतरांनाही व्यसनाला बळी पडण्यापासून रोखावे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राऊत, प्रा. घुगे यांनी मोलाचे सहकार्य केले. सुत्रसंचालन शुभम काळमुंदळे यांनी केले तर आभार निलेश राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी, विद्याथीर्नी मोठ्या संख्येने उपस्थित होते.