विहिंपच्या कार्यासाठी तरुणाईचा सहभाग गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 AM2021-09-02T05:30:23+5:302021-09-02T05:30:23+5:30

केमिस्ट भवन येथे आयोजित कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ मिश्रीलाल बजाज, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ बी.एम. ठाकरे, अमरावती ...

Youth participation is needed for the work of VHP | विहिंपच्या कार्यासाठी तरुणाईचा सहभाग गरजेचा

विहिंपच्या कार्यासाठी तरुणाईचा सहभाग गरजेचा

Next

केमिस्ट भवन येथे आयोजित कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ मिश्रीलाल बजाज, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ बी.एम. ठाकरे, अमरावती विभाग बजरंग दल संयोजक संतोष गहेरवार, राम ठाकरे, किशोर घोडचर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्रीराम व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व ज्येष्ठ समाजसेवक पुरुषोत्तम तुकाराम हिवरकर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ दोन ऑक्सिजन मशीनचे लोकार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारसेवकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण युवाव्याख्याते सोपान कनेरकर यांचे व्याख्यान ठरले. विश्व हिंदू परिषद स्थापनेपासून करण्यात आलेली महत्त्वपूर्ण आंदोलने, राम मंदिराचा संपूर्ण इतिहास युवा प्रेरणादायी वक्ते कनेरकर यांनी आपल्या वाणीतून उपस्थित नाथ नगरीतील राष्ट्रप्रेमीना सांगितला. त्यांनी अस्खलित भाषण शैलीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विश्व हिंदू परिषदचे कार्य, तरुण कसा असावा, राष्ट्र प्रथमची भावना प्रत्येकाने कशी रुजवावी, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर त्यांनी आपले परखड विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश मुंधरे, संतोष आवटे, गजानन हिवरकर, गणेश ढगे, प्रशांत तळेकर, स्वप्निल निलटकर, मयूर ठाकरे, नीलेश बावणे, शिवम हिवरकर, वैभव हिवरकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचालन सतीश हिवरकर यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश वाघ यांनी केले.

Web Title: Youth participation is needed for the work of VHP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.