थॅलेसिमिया रुग्णांसाठी ' संकल्प 'च्या युवकांनी वाजविले ढोल; उच्चशिक्षित युवकांचा समाजसेवी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:23 AM2017-08-28T11:23:18+5:302017-08-28T11:36:42+5:30

वाशिम, दि.28- स्थानिक तिरुपती सिटी या वसाहतीमधील गणेशोत्सव मंडळाने थॅलेसिमिया रुग्णांना आर्थिक मदत प्राप्त व्हावी या उद्देशाने सिने अभिनेता ...

The youth of 'Sankalp' played for thalassemia patients drums; Social education programs of highly educated youth | थॅलेसिमिया रुग्णांसाठी ' संकल्प 'च्या युवकांनी वाजविले ढोल; उच्चशिक्षित युवकांचा समाजसेवी उपक्रम

थॅलेसिमिया रुग्णांसाठी ' संकल्प 'च्या युवकांनी वाजविले ढोल; उच्चशिक्षित युवकांचा समाजसेवी उपक्रम

Next
ठळक मुद्दे स्थानिक तिरुपती सिटी या वसाहतीमधील गणेशोत्सव मंडळाने थॅलेसिमिया रुग्णांना आर्थिक मदतीसाठी ढोल-ताश्यांचं वादन करण्यात आलं. सिने अभिनेता नाना पाटेकर यांच्या ' नाम ' फाऊंडेशनता मदत करणाऱ्या संकल्प प्रतिष्ठान अकोला यांना बोलावून २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत ढोल-ताशांचं वादन केलं .

वाशिम, दि.28- स्थानिक तिरुपती सिटी या वसाहतीमधील गणेशोत्सव मंडळाने थॅलेसिमिया रुग्णांना आर्थिक मदत प्राप्त व्हावी या उद्देशाने सिने अभिनेता नाना पाटेकर यांच्या ' नाम ' फाऊंडेशनता मदत करणाऱ्या संकल्प प्रतिष्ठान अकोला यांना बोलावून २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत ढोल-ताशांचं वादन केलं .

अकोला येथील संकल्प प्रतिष्ठान ही संस्था ढोल ताशे वाजवून समाजसेवी उपक्रम राबविते. याची माहिती तिरुपती सिटी गणेशोत्सव मंडळाला मिळाल्याने त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला . यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने यावर्षी थॅलेसिमिया रुग्णांना आर्थिक मदतीसाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने सामाजिक उपक्रमाची माहिती मिळाली . या सामाजिक उपक्रमात आपला सहयोग मिळावा यासाठी तिरुपती सिटी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी या वसाहतीसह शहरातील शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती . संकल्पच्या सदस्यांनी वाजविलेल्या ढोल ताशांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी या उपक्रमास सढळ हाताने मदत केल्याने जवळपास ६० हजार रुपये रुग्णांना आर्थिक मदतीसाठी गोळा झाले . यासाठी गिरीष लाहोटी व सिटीमधील रहिवासी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . एकीकडे गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत चालले असताना तिरुपती सिटी गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला.

{{{{dailymotion_video_id####x845abr}}}}

Web Title: The youth of 'Sankalp' played for thalassemia patients drums; Social education programs of highly educated youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.