युवकांनी स्वयंरोजगार निर्मितीकडे वळावे - खासदार भावना गवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 02:01 PM2018-11-23T14:01:30+5:302018-11-23T14:01:45+5:30
मानोरा : १० ते १२ वी पास नापास विद्यार्थ्यांनी किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदवुन स्वयंरोजगार निर्मितीकडे आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन खा.भावना गवळी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : १० ते १२ वी पास नापास विद्यार्थ्यांनी किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदवुन स्वयंरोजगार निर्मितीकडे आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन खा.भावना गवळी यांनी केले. ते मानोरा तालुका शिवसेना व प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या वसंतराव नाईक सभागृहात मोफत प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन खा.भावनाताई गवळी होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश डहाके तर प्रमुख अतिथी म्हणुन उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील तुरक, शिवसेना तालुका प्रमुख रवि पवार, शहर प्रमुख राजु देशमुख, सहकार नेते सुरेश गावंडे, माजी सभापती अशोकराव देशमुख, माजी जि.प.सदस्य भाऊ नाईक, बाजार समितीचे उपसभापती राजेश नेमाने, माजी जि.प.सदस्य उकंंडा राठोड, खरेदी विक्रीचे अध्यक्ष सुरेंद्र देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश राठोड, कारंजा तालुका शिवसेना प्रमुख विष्णु तिडके, खरेदी विक्रीचे संचालक मोतीराम ठाकरे, रामराव राठोड, राजु पाटील, संतोष पाडे, दादा केदार,दिलीप पडवाळ, विनोदआप्पा घाटरे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश डहाके यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्रात बेरोजगार ना प्रशिक्षणाच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध करण्याची सुवर्ण संधी आहे, तेव्हा संधीचे सोने करावे असे सांगितले. शिवसेना तालुका प्रमुख रवि पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना देशात कौशल्य विकास ५५७ केंद्र असुन त्यात महाराष्ट्रात वाशिम जिल्हा आहे. विद्यार्थ्यांनी स्कील आत्मसात करावा, पंचायत समितीच्या सभागृहात ४०० च्या वर मुलामुलीने मोफत शिबिराचे अर्ज भरुन घेतले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव घाडगे यांनी केले. सुत्रसंचालन चंद्रकांत राठोड तर आभार राजेश नेमाने यांनी मानले.