गुणांकन पद्धतीने आरक्षणासाठी युवा क्रीडा संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:33+5:302021-01-08T06:11:33+5:30

सद्य:स्थितीत खेळाडूंना नोकरीत असलेल्या आरक्षणात खेळाडूने प्रत्यक्ष खेळासाठी किती योगदान दिले. त्याचे मूल्यमापन केले जात नाही. ही पद्धत अयोग्य ...

Youth sports organization aggressive for reservation by scoring method | गुणांकन पद्धतीने आरक्षणासाठी युवा क्रीडा संघटना आक्रमक

गुणांकन पद्धतीने आरक्षणासाठी युवा क्रीडा संघटना आक्रमक

Next

सद्य:स्थितीत खेळाडूंना नोकरीत असलेल्या आरक्षणात खेळाडूने प्रत्यक्ष खेळासाठी किती योगदान दिले. त्याचे मूल्यमापन केले जात नाही. ही पद्धत अयोग्य असल्याचा युवा क्रीडा संघटनेचा युक्तिवाद आहे. त्यामुळेच शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय नोकरीत थेट नियुक्ती, तसेच गुणांकन पद्धतीने क्रीडा आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेकडून प्रा. सागर मगरे, सागर गुल्हाने या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ‘मिशन क्रीडा आरक्षण’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत राज्यात विविध ठिकाणी संघटनेच्या बैठकांचे आयोजन केले जात आहे. यात बीड, परभणी, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद आणि वाशिम शहरात आजवर संघटनेच्या बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांत संघटनेच्या मागण्या शासनदरबारी कशा मांडायच्या आणि पुढील काळात संघटनेची दिशा काय असेल, याबाबत चर्चा करण्यात येत आहे. या बैठकींना खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

वाशिम येथे पार पडलेल्या बैठकीला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू सागर गुल्हाने, उन्मेश शिंदेंसह अजित बुरे, महेश ठाकरे, सुमेध मुद्रे, प्रतीक गवई, सौरभ ताजणे, रोशन चव्हाण, ऋषिकेश देशमुख, राहुल सोनवणे, संदेश अर्जुने, ऋषिकेश गावंडे, प्रतीक मात्रे, हर्ष काकडे, श्रेयश ढगे आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.

===Photopath===

070121\07wsm_1_07012021_35.jpg

===Caption===

गुणांकन पद्धतीने आरक्षणासाठी युवा क्रीडा संघटना आक्रमक

Web Title: Youth sports organization aggressive for reservation by scoring method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.