युवकास चाकू मारून केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:35+5:302021-04-04T04:42:35+5:30

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी मो. शहेजाद मो. तसव्वर (२३, रा. सुपर कॉलनी, मंगरूळपीर) या युवकाने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद ...

The youth was stabbed and injured | युवकास चाकू मारून केले जखमी

युवकास चाकू मारून केले जखमी

Next

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी मो. शहेजाद मो. तसव्वर (२३, रा. सुपर कॉलनी, मंगरूळपीर) या युवकाने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तो व त्याचे काही मित्र दर्गाह चौक येथे लस्सी पिण्यासाठी गेले होते. यावेळी वाद घालत आरोपी अ. सोहील अ. बशीर याने शाहदत खान शौकत खान यास चाकू मारला. तसेच बबलू, सुफियान व फिरोज यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास नापोकॉ गणेश नागरिकार, पोकॉ दिनेश चिस्तळकर करत आहेत. या घटनेतील जखमीला उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The youth was stabbed and injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.