जिल्ह्यात युवा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:34 AM2021-01-15T04:34:09+5:302021-01-15T04:34:09+5:30
----- खेलो इंडिया अंतर्गत ८०० शाळांची नोंदणी वाशिम: केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ची घोषणा करण्यात आली आहे. ...
-----
खेलो इंडिया अंतर्गत ८०० शाळांची नोंदणी
वाशिम: केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत देशातील प्रत्येक विद्याथ्यार्ची ‘फिटनेस असेसमेंट टेस्ट’ घेण्याचे निर्देशित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ८०० पेक्षा अधिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीला २७ डिसेंबरनंतर १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
-----
लोककला, पथनाट्य पथक निवड कार्यक्रम
वाशिम: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोककला, पथनाट्याद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला, पथनाट्य पथकांची निवड सूची तयार करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील अनुभवी संस्थांनी आपले अर्ज २१ जानेवारीपर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन
वाशिम,: राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा पुरस्कार २६ जानेवारीला वितरीत करण्यात येणार आहे. यात वाशिम जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू, १ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक मिळून चार पुरस्कार देण्यात येणार आहेत, यासाठी २१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.