रिसोडकरांनी केली पन्हाळ-पावनखिंड पद भ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 04:44 PM2019-07-27T16:44:56+5:302019-07-27T16:45:02+5:30
रिसोड : मुसळधार पाऊस, बोचरा वारा व घनदाट जंगल, चिखलाच्या वाटा अशा वातावरणात हिंदवी परिवाराच्यावतीने आयोजित पन्हाळ गढ ते पावनखिंड परिसर पद भ्रमंती मोहीम रिसोडच्या युवा मावळ्यांनी यशस्वी पूर्ण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : मुसळधार पाऊस, बोचरा वारा व घनदाट जंगल, चिखलाच्या वाटा अशा वातावरणात हिंदवी परिवाराच्यावतीने आयोजित पन्हाळ गढ ते पावनखिंड परिसर पद भ्रमंती मोहीम रिसोडच्या युवा मावळ्यांनी यशस्वी पूर्ण केली. यात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह माजी नगराध्यक्ष मिळून २१ जण सहभागी झाले होते, अशी माहिती इतिहासकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी गुरुवारी दिली.
हिंदवी परिवाराचे सर्वेसर्वा इतिहासकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. नेवापुरातील विर शिवा काशिद यांच्या समाधी व पुतळ्याचे पुजन झाल्यानंतर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे पूजन झाले. राजदिंडी मार्गे १३ जुलै रोजी या मोहिमेस सुरुवात झाली. तुरकवाडी मसाई पठार, कुंबार वाडी, खोतेवाडी हा असा मोहिमेचा पहिला टप्पा होता. दुसºया दिवशी १४ जुलै रोजी खोतेवाडीतून दुस?्या टप्यातील मोहिमेस व पद भ्रमंतीस सुरुवात झाली. मांडलाईवाडी, आंबेवाडी रिंगेवाडी धनगरवाडा मार्गे सायंकाळी सहाच्या सुमारास मोहीमेतील वीर पांढरेपाणी येथे पोहचले. पन्हाळगडापासून निघालेली पद भ्रमंती झिम्माड पाऊस अंगाला झोंबणारा गार वारा, हिरवे गार डोंगर, दºयाखोºयातून खळखळणारे छोटे मोठे धबधबे, जमिनीवर उतरणारे ढग धुक्यात हरवलेली मसाई पठार अनुभवली. हिंदवी परिवाराच्यावतीने आयोजित या मोहिमेमध्ये राज्यासह पर राज्याच्या शिव प्रेमिंचा सहभाग होता या पद भ्रमंतीमध्ये मुख्याधिकारी गणेश पांडे, माजी नगराध्यक्ष यशवंत देशमुख, माजी न.प. उपाध्यक्ष सदाशिव चौधरी, तलाठी स्वप्नील धांडे, धनंजय काष्टे, विकास इरतकर यांच्यासह एकवीस युवकांचा सहभाग होता. मावळ्यांनी छत्रपति शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणा देत पद भ्रमंती चा मार्ग होती. १५ जुलै रोजी पांढरे पाणी येथे इतिहासकार डॉ. शेटे यांनी शिवाजी महाराज यांनी पन्हाळागड ते पावनखिंड एका रात्रीत केलेल्या प्रवासाचे वर्णन पोवाडया तून सांगितले. यावेळी शिवप्रेमी सह्याद्री च्या धो-धो पावसात मंत्रमुग्न्न झाली होती. (प्रतिनिधी)