जिल्हा परिषदेच्या ८३ शाळा ‘क्षतिग्रस्त’!
By Admin | Published: October 9, 2016 01:44 AM2016-10-09T01:44:48+5:302016-10-09T01:44:48+5:30
वाशिम जिल्ह्यातील ८३ जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
वाशिम, दि. 0८- गत दोन ते तीन वर्षांपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील ८३ जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकंदरित ७७९ शाळा आहे. यापैकी सुमारे ८३ शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत. काही शाळांच्या वर्गखोली वादळवारा व अवकाळी पावसाने जमिनदोस्त केल्या. परिणामी, दोन-तीन वर्गातील विद्यार्थ्यांंना एकाच वर्गखोलीत बसविण्याची वेळ शिक्षकांवर आली. हिवाळा आणि उन्हाळ्यात हा प्रकार चालून जातो. मात्र, पावसाळ्यात समस्या अधिकच बिकट होत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनाही अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. जुन्या वर्गखोल्यांची दुरूस्ती आणि नव्याने वर्गखोली मंजूर करण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकवेळा चर्चेत आला होता. नोव्हेंबर २0१५ मध्ये शासनाने ८३ शाळेच्या १00 वर्गखोली बांधकामाला मंजुरातही दिली. मात्र, याप्रकरणी अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
वाशिम : गत दोन ते तीन वर्षांंपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील ८३ जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांंची प्रचंड गैरसोय होत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकंदरित ७७९ शाळा आहे. यापैकी सुमारे ८३ शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत. काही शाळांच्या वर्गखोली वादळवारा व अवकाळी पावसाने जमिनदोस्त केल्या. परिणामी, दोन-तीन वर्गातील विद्यार्थ्यांंना एकाच वर्गखोलीत बसविण्याची वेळ शिक्षकांवर आली. हिवाळा आणि उन्हाळ्यात हा प्रकार चालून जातो. मात्र, पावसाळ्यात समस्या अधिकच बिकट होत असल्याने विद्यार्थ्यांंसोबतच शिक्षकांनाही अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. जुन्या वर्गखोल्यांची दुरूस्ती आणि नव्याने वर्गखोली मंजूर करण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकवेळा चर्चेत आला होता. नोव्हेंबर २0१५ मध्ये शासनाने ८३ शाळेच्या १00 वर्गखोली बांधकामाला मंजुरातही दिली. मात्र, याप्रकरणी अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.