जिल्हा परिषद निवडणूक : वाशिममध्ये ५२ गटाकरिता ५०३ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 01:31 PM2019-12-24T13:31:40+5:302019-12-24T13:32:07+5:30

२३ डिसेंबरपर्यंत ५२ जिल्हा परिषद गटासाठी ५०३ तर १०४ पंचायत समिती गणासाठी ८९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

Zilla Parishad Elections: 503 application for 52 groups in Washim | जिल्हा परिषद निवडणूक : वाशिममध्ये ५२ गटाकरिता ५०३ अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक : वाशिममध्ये ५२ गटाकरिता ५०३ अर्ज

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत अर्थात २३ डिसेंबरपर्यंत ५२ जिल्हा परिषद गटासाठी ५०३ तर १०४ पंचायत समिती गणासाठी ८९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ५२ गटांकरिता आणि त्याअंतर्गत असलेलया सहा पंचायत समितींच्या १०४ गणांसाठी येत्या ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक होऊ घातली आहे. १८ डिसेंबरपासून निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज स्विकारले जात असून अंतिम मुदतीपर्यंत २३ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या ५२ गटांकरिता ५०३ तर पंचायत समितीच्या १०४ गणांकरिता ८९१ उमेदवारी अर्ज दाखल केले.
रिसोड तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट असून एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर १८ पंचायत समिती गणासाठी १८० उमेदवारी अर्ज दाखल झाले. कारंजा तालुक्यात जिल्हा परिषदेचे ८ गट असून, ८४ उमेदवारी अर्ज तर १६ पंचायत समिती गणासाठी ९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मालेगाव तालुक्यात ९ जिल्हा परिषद गटासाठी १२० तर १८ पंचायत समिती गणासाठी १४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मानोरा तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी एकूण ८८ तर पंचायत समिती गणासाठी १४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मंगरूळपीर तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटांसाठी ६४ तर १८ पंचायत समिती गणासाठी १३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. वाशिम तालुक्यात १० जिल्हा परिषद गटासाठी १५४ तर २० पंचायत समिती गणासाठी २०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. संबंधित तहसिल कार्यालय परिसरात उमेदवारांच्या समर्थकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad Elections: 503 application for 52 groups in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.