जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणूक : बाळासाहेब आंबेडकर, अनंतराव देशमुख एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 12:55 PM2021-07-03T12:55:12+5:302021-07-03T12:55:18+5:30
Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections: बाळासाहेब आंबेडकर व जनविकास आघाडीचे अनंतराव देशमुख एकत्र आल्याने निवडणूक जड हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीची जिल्ह्यातील सर्वच जागेवर युती करण्यात आली असून तशी घाेषणा २ जुलै राेजी वाशिम येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी दाेन्ही पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित हाेती. वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर व जनविकास आघाडीचे अनंतराव देशमुख एकत्र आल्याने निवडणूक जड हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच जागेवर वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीची अधिकृत घोषणा वाशिम येथे विदाता येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर, जिल्हा जनविकास आघाडीचे नेते ॲड. नकुलदादा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष गजाननराव लाटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे जन विकासचे गटनेते स्वप्नील सरनाईक, वंचित आघाडीचे महासचिव सिद्धार्थ देवरे, प्रदेश सदस्य किरणताई गिर्हे, जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे, रिसोड पंचायत समिती सभापती सुभाषराव खरात यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते. पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी व जिल्हा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकत्यार्ंचाच भरणा जास्त दिसून आला. विशेष म्हणजे युती झाल्यानंतर घाेषणानाही देण्यात आल्यात.
जिल्हा परिषद, पंचायत समिती जागा वाटप
जिल्ह्यात हाेऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरिता भरजहाॅंगीर, पांगरी, माेप, महागाव, जऊळका, जाेडगव्हाण, शिरपूर, मारसुळ निवडणूक वंचित बहुजन विकास आघाडी लढेल तर गाेभणी, कवठा, कवठा (पं.स.), हराळ, खंडाळा येथील जागेवर जनविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढणार असल्याची घाेषणा करण्यात आली. तर वाकद येथे मैत्रीपूर्ण लढत हाेणार आहे.