साखरा जिल्हा परिषद शाळा झाली आंतरराष्ट्रीय शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:21 PM2018-12-24T16:21:48+5:302018-12-24T16:22:37+5:30

वाशिम : वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचा दर्जा प्राप्त झाला असून २५ डिसेंबर रोजी या शाळेचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे नामकरण करण्यात येत आहे

Zilla Parishad School become International School | साखरा जिल्हा परिषद शाळा झाली आंतरराष्ट्रीय शाळा

साखरा जिल्हा परिषद शाळा झाली आंतरराष्ट्रीय शाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचा दर्जा प्राप्त झाला असून २५ डिसेंबर रोजी या शाळेचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे नामकरण करण्यात येत आहे. हा नामकरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे.
 राज्यातील मुलांना जागतिक  दर्जाचे उत्तम शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील १३ शाळांची निवड ‘ओजस आंतरराष्ट्रीय शाळा’  म्हणून मे २०१८ मध्ये करण्यात आली. यामध्ये वाशिम तालुक्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळावे म्हणून राज्यात ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्यूकेशन बोर्ड’ (एमआयईबी) स्थापन केले असून, शैक्षणिक सत्र २०१८-१९ पासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमानुसार साखरा येथील शाळेत नर्सरी ते तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. तर चवथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्याच्या अभ्यासक्रमानुसार शिकविले जात आहे. पुढच्या वर्षी चवथ्या वर्ग, त्यानंतर पाचवा, सहावा असा टप्प्याटप्प्याने १२ व्या वर्गापर्यंत ‘एमआयईबी’चा अभ्यासक्रम लागू होणार आहे.
२५ डिसेंबर रोजी या शाळेचे नामकरण ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे केले जाणार आहे. यावेळी वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, वाशिमचे सहपालकमंत्री मदन येरावार, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार संजय धोत्रे, खासदार भावना गवळी, आमदार गोपिकिशन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, जिल्हाधिकारी लक्ष्मिनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जि. प. चे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती सुधिर गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव, विश्वनाथ सानप, अमरावतीचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी सांगितले.


३५ एकरात जागतिक दर्जाच्या सुविधा राहणार
साखरा येथील जिल्हा परिषद शाळा ३५ एकराच्या परिसरात साकारणार आहे. गावापासून अर्धा किमी अंतरावर असलेली ३५ एकर जागा मिळाली असून, या जागेवर शाळेची इमारत, स्विमिंग पूल, क्रिडांगणे, अभ्यासिका, वाचनालय, प्रयोगशाळा, ध्यानकेंद्र यासह जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. नवीन शाळेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, दानशूरांच्या लोकसहभागातून लाखो रुपयांची जूळवाजूळव केली जात आहे.

Web Title: Zilla Parishad School become International School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.