शेवती जिल्हा परिषद शाळा आढळली शिक्षकाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 04:35 PM2018-08-01T16:35:12+5:302018-08-01T16:35:22+5:30

वाशिम - जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांनी दिलेल्या आकस्मिक भेटीदरम्यान कारंजा तालुक्यातील शेवती येथील दोन शिक्षकी असलेली जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली.

Zilla Parishad school without the teacher | शेवती जिल्हा परिषद शाळा आढळली शिक्षकाविना

शेवती जिल्हा परिषद शाळा आढळली शिक्षकाविना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांनी दिलेल्या आकस्मिक भेटीदरम्यान कारंजा तालुक्यातील शेवती येथील दोन शिक्षकी असलेली जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावा, असे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कारंजा गटविकास अधिकाºयांना दिले.
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत बुधवार, १ आॅगस्ट रोजी शेवती येथे जिल्हा परिषद पदाधिकाºयांसह अधिकाºयांनी भेट दिली असता अनेक बाबी उघडकीस आल्या. शेवती येथील जिल्हा परिषदेची शाळा ही दोन शिक्षकी असून, येथे किमान एक शिक्षक तरी उपस्थित राहणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांच्यासह अधिकाºयांनी शाळेला भेट दिली असता, एकही शिक्षक आढळून आला नाही. या प्रकाराची जिल्हा परिषद अध्यक्षांनी गंभीर दखल घेत चौकशी करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिल्या. केंद्र प्रमुखांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत कापडे यांनी याप्रकरणी जाब विचारला. गटशिक्षणाधिकाºयांनी या दोन्ही शिक्षकांची एकाचवेळी रजा मंजूर केल्याची बाब समोर आली. दोन्ही शिक्षकांची एकाचवेळी रजा मंजूर का केली यासंदर्भात गटशिक्षणाधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश कापडे यांनी गटविकास अधिकाºयांना दिले. शेवती शाळेवरील शिक्षक हे कारंजा येथून अप-डाऊन करतात, अशीही माहिती जिल्हा परिषद अध्यक्षांसह अधिकाºयांना मिळाली.

Web Title: Zilla Parishad school without the teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.