जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी घेतली शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 02:54 PM2020-02-12T14:54:25+5:302020-02-12T14:54:50+5:30
यावेळी विविध प्रकारच्या औषधींचा काही प्रमाणात तुटवडा असल्याची बाब समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांनी शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राला १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भेट देत झाडाझडती घेतली. यावेळी विविध प्रकारच्या औषधींचा काही प्रमाणात तुटवडा असल्याची बाब समोर आली.
डॉ. शाम गाभणे यांनी केंद्रातील औषधी उपलब्धतेबद्दल माहिती घेतली. यावेळी अँन्टीबायोटिक इंजेक्शन, अस्थमा इंजेक्शन, गर्भवती महिलांची सुलभ प्रसूतीसाठी आवश्यक असणारे आॅक्सिटोसीन व डीएनएस तुटवडा असल्याची माहिती आरोग्यवर्धिनी केंद्रातून देण्यात आली. उपस्थित रुग्णांच्या समस्याही जाणून घेतल्या. रुग्णांच्या बोलण्यातून काही आवश्यक औषधींचा तुटवडा असल्याचे समोर आले. औषधीचा तुटवडा असल्याने रुग्णांना योग्य उपचार कसे मिळतील, असा प्रश्न उपस्थित झाला. ही बाब लक्षात घेता डॉ. गाभणे यांनी शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात तुटवडा असलेली औषधी जिल्हास्तरावर उपलब्ध असल्यास तात्काळ पाठवून देण्यात येईल तसेच जिल्हास्तरावरही तुटवडा असलेली औषधी खरेदी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल अशी ग्वाही उपाध्यक्ष डॉ गाभणे यांनी दिली. तुटवडा असलेल्या सिरींज रुग्ण कल्याण निधीतून खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी वैद्यकीय अधिकाºयांना दिल्या.