जिल्हा परिषदेला ६६ प्राथमिक शिक्षकांची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 07:18 PM2017-07-31T19:18:06+5:302017-07-31T19:21:19+5:30
वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरलेल्या एकूण २१३ पैकी ६६ प्राथमिक शिक्षकांची अद्याप प्रतीक्षा कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरलेल्या एकूण २१३ पैकी ६६ प्राथमिक शिक्षकांची अद्याप प्रतीक्षा कायम आहे.
गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले होते. यावर्षी शासनाने हा प्रश्न निकाली काढला असून, जून महिन्यात आॅनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत अन्य जिल्ह्यातील २१३ प्राथमिक शिक्षक हे वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरले आहेत तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७४ शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलून गेले. २१३ पैकी १४८ शिक्षक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रूजू झाले असून, त्यांचे समुपदेशन पद्धतीने जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर समायोजनही करण्यात आले. उर्वरीत ६६ शिक्षक कधी रूजू होतात, हे अद्याप अनिश्चित आहे. ६६ शिक्षकांना त्यांच्या मूळ जागेवरून कार्यमुक्त करण्यात आले नसल्याची माहिती आहे.