‘स्वच्छते’साठी जिल्हा परिषदेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 08:11 PM2017-08-03T20:11:49+5:302017-08-03T20:13:49+5:30

वाशिम - गतवर्षी हगणदरीमुक्त न झालेल्या निवडक गावांना यावर्षी हगणदरीमुक्त घोषित करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्या अनुषंगाने संबंधित गावांत स्वच्छता चमूसह सामाजिक कार्यकर्ता, कार्यकर्ती यांची विशिष्ट कालावधीसाठी नियुक्ती केली जाणार आहे.

Zilla Parishad's 'Action Plan' for 'Cleanliness' | ‘स्वच्छते’साठी जिल्हा परिषदेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

‘स्वच्छते’साठी जिल्हा परिषदेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Next
ठळक मुद्देगतवर्षी हगणदारीमुक्त न झालेल्या गावांकरीता ‘अ‍ॅक्शन प्लॅन’संबंधित गावांसाठी होणार स्वच्छता दुतांची नियुक्तीउत्सुक सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - गतवर्षी हगणदरीमुक्त न झालेल्या निवडक गावांना यावर्षी हगणदरीमुक्त घोषित करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्या अनुषंगाने संबंधित गावांत स्वच्छता चमूसह सामाजिक कार्यकर्ता, कार्यकर्ती यांची विशिष्ट कालावधीसाठी नियुक्ती केली जाणार आहे.
घरी शौचालय बांधकाम केल्यानंतरही काही जण उघड्यावर ‘शौच’वारी करतात. उघड्यावरील ‘शौच’वारी नियंत्रणात आणणे आणि अधिकाधिक गावे हगणदरीमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. निवडक गावांमध्ये शौचालय बांधकाम व अन्य कामांत सुसुत्रता यावी, शौचालय बांधकामांना गती यावी आणि गावातील विविध उपक्रमांची व्यवस्थित बांधणी करण्यासाठी गावातीलच एका उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता, कार्यकर्ती यांची विशिष्ट कालावधीसाठी स्वच्छता प्रेरक म्हणून नेमणुक केली जाणार आहे. यासाठी एका गावातील किमान दोन व कमाल पाच व्यक्तिंना १० आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद वाशिम येथे बोलावून गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे. अंतिम निवड झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. या स्वच्छता प्रेरकांना प्रशिक्षणही देण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. गावात राहणारे आणि गावासाठी वेळ देऊ शकणाºया सामाजिक कार्यकर्त्यांनी पंचायत समितीअंतर्गत स्वच्छता कक्षामध्ये नोंदणी करण्याचे आवाहन गणेश पाटील यांनी केले.
 

Web Title: Zilla Parishad's 'Action Plan' for 'Cleanliness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.