जि.प. स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:37 AM2021-01-21T04:37:07+5:302021-01-21T04:37:07+5:30
जिल्हा परिषदेच्या काॅन्फरन्स हाॅलमध्ये पार पडलेल्या या सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी उपाध्यक्ष ...
जिल्हा परिषदेच्या काॅन्फरन्स हाॅलमध्ये पार पडलेल्या या सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, सभापती सर्वश्री चक्रधर गोटे, विजय खानझोडे, वनिता देवरे, शोभाताई गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत मागील तहकूब झालेल्या स्थायी समिती सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाची सन २०२०-२१ साठीची राज्यदर सूची जिल्हा परिषदेला लागू करण्याबाबत, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२०-२१ व ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण व इतर जिल्हा रस्ते विकास मजबुतीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळणे, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता मिळणे, सन २०२०-२१ मध्ये पशुवैद्यकीय संस्थांना औषध पुरवठा करणे यासह अन्य कामांना प्रशासकीय मंजुरी मिळण्यावर चर्चा झाली. यावेळी जि.प.सदस्य अरविंद पाटील इंगोले, पांडुरंग ठाकरे, डाॅ. सुधीर कवर, स्वप्नील सरनाईक, दिलीप मोहनावाले, उमेश ठाकरे, चरण गोटे, आशिष दहातोंडे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, संजय जोल्हे, पशुसंवर्धन अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डाॅ. विनोद वानखडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.